Join us
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटींच्या 'पठाण'साठी शाहरुख खाननं घेतले इतके कोटी, आकडा वाचून येईल तुम्हाला भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:58 IST

Pathaan Movie : जवळपास २५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या पठाण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल हे माहीत नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण यांचा ‘पठाण’ (Pathaan movie) हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील गाण्यांपासून ते ट्रेलरपर्यंत रिलीज झाले असून, ते पाहून चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. दुसरीकडे, ट्रेलरबद्दल सांगायचे झाले तर, लोकेशनपासून ते स्फोटक अॅक्शनपर्यंत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सुमारे २५० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल याची माहिती नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी किती कोटी घेतले आहेत. हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

अॅक्शन आणि रोमान्सने भरलेल्या शाहरुख खानच्या चित्रपटातील त्याचा किलर लूक चाहत्यांना खूप आवडतो. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर अभिनेत्याचा फिटनेस आणि लांब केस लक्ष वेधून घेत आहे. हा लूक मिळवण्यासाठी त्याला ३ महिने लागले असले तरी. दरम्यान, Koimoi.com च्या वृत्तानुसार, शाहरुखने पठाण चित्रपटासाठी सुमारे १०० कोटी रुपये घेतले आहेत, जे संपूर्ण कलाकारांमध्ये सर्वाधिक आहे.

शाहरुख खान जवळपास चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतणार आहे, ज्यामुळे तो पूर्वी कधी मक्का तर कधी वैष्णोदेवीला जाताना दिसला होता. याशिवाय नोएडा येथील एक्स्पोमध्येही तो सहभागी होताना दिसला होता. त्याचवेळी दुबईच्या बुर्ज खलिफा येथे पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून तो नुकताच मुंबईत पोहोचला आहे. यादरम्यान पठाणच्या झूम जो पठान या गाण्याच्या अरबी आवृत्तीवरचा त्याचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. याशिवाय शाहरुख खान आस्क एसआरकेच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहम