शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan) पुन्हा चर्चेत आला आहे. २०२० मध्ये ड्रग्स केस प्रकरणात त्याचं नाव आलं होतं. आर्यनला अटकही झाली होती. तेव्हा ते प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. आता चार वर्षांनंतर काल न्यू इयर पार्टीत आर्यनचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो नशेत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. त्याचा व्हिडिओ पाहून पुन्हा आर्यनची चर्चा सुरु झाली आहे.
व्हिडिओमध्ये आर्यन खानने व्हाईट टीशर्ट आणि ब्लू जॅकेट घातला आहे. त्याच्यासोबत त्याचे जवळचे मित्र आणि बॉडीगार्ड आहेत. आर्यन वर न बघता पुढे चालताना दिसत आहे. पापाराझींनी अनेकदा आवाज देऊनही तो समोर बघत नाही आणि निघून जातो. आर्यनची ब्राझिलियन रुमर्ड गर्लफ्रेंड लारिसाही या पार्टीत आली होती. नंतर दोघंही वेगवेगळ्या गाडीतून रवाना झाले.
आर्यनच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. 'हा नशेत आहे','वाह किती सरळ चालतोय,सावधान!",'शाहरुखसाठी वाईट वाटत आहे'. आर्यन खानच्या या व्हिडिओवर अनेक निगेटिव्ह कमेंट्सही आल्या आहेत.
आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र तो अभिनेता नाही तर दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेली पहिलीच सीरिज येत्या काही महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.