Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ed Sheeran ला मोह आवरला नाही! शाहरुखसोबत खास पोझ देऊन लुटली वाहवा, व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 11:43 IST

शाहरुख खान आणि Ed Sheeran चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

शाहरुख खानचे केवळ भारतात नाही तर जगभरात चाहते आहेत. शाहरुखवर त्याचे चाहते अक्षरशः जीव ओवाळून टाकत असतात. शाहरुखही चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत असतो. सुप्रसिद्ध गायक ED Sheeran सध्या त्याच्या संगीत मैफिलीसाठी भारतात आहे. ED Sheeran सध्या त्याच्या म्युझिक कॉन्सर्टआधी बॉलिवूडच्या कलाकारांची भेट घेतोय. अशातच ED ने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची खास भेट घेतली. त्यावेळी शाहरुखने ED सोबत त्याची खास सिग्नेचर पोझ दिली.

शाहरुख खान आणि ED Sheeran चा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत शाहरुख Ed ला डान्स शिकवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ED ने शाहरुख खानची खास सिग्नेचर स्टेप केली. शाहरुख सुद्धा ED ला त्याची स्टेप शिकवताना दिसला. फराह खानने हा व्हिडीओ शेअर केला असून चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय.

ED Sheeran ने याआधी 2017 मध्ये भारताला भेट दिली होती आणि त्याने त्याच्या पहिल्या भारतीय कॉन्सर्टनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी केली होती. आता १६ मार्चला मुंबईच्या महालक्ष्मी येथे ED Sheeran पुन्हा एकदा लाईव्ह कॉन्सर्टसाठी सज्ज आहे. यावेळी ED Sheeran सोबत लोकप्रिय गायक प्रतीक कुहाड परफॉर्म करताना दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडफराह खान