Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडील बॉलिवूडचा 'बादशाह', तरीही लेक सुहानाचा OTT मधून डेब्यू का? आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 20:20 IST

सुहानाने मोठ्या पडाद्याऐवजी नेटफ्लिक्सच्या 'आर्चिज' मधून केला डेब्यू

Suhana Khan Archies Debut, Shahrukh Khan : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने ' द आर्चीज' सिनेमातून नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात सुहाना सोबतच श्रीदेवीची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या स्टारकिड्सनेही पदार्पण केले आहे. पण  स्टारकिड्स चा हा डेब्यू मोठ्या पडद्यावर न होता ओटीटी OTT माध्यमातून का झाला असेल असा प्रश्न पडतो. याचंच उत्तर जाणून घेऊया

शाहरुख खानचे स्वतःचे 'रेड चिलीज' प्रोडक्शन हाऊस आहे. त्याला आपल्या लाडक्या लेकीचं पदार्पण स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसमधून सहज करता आलं असतं. पण त्याने तसे केले नाही. मार्केटिंग जिनिअस शाहरुखने झोया अख्तरच्या सिनेमातुन सुहानाला लॉंच केले तेही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. यामागचं मुख्य कारण म्हणजे नेटफ्लिक्स च्या माध्यमातून सुहानासाठी जगभरातील फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे खुले झाले आहेत. 'द आर्चीज' सिनेमातून केवळ भारतीय नाही तर इंग्लिश प्रेक्षकही जोडले गेले आहेत. भारतीय प्रेक्षक सिनेमाकडे शाहरुखच्या लेकीचा सिनेमा म्हणून पाहतील पण इंग्लिश प्रेक्षक मात्र त्याकडे 'द आर्चीज' म्हणूनच पाहतील. शाहरुखने मार्केटींग शक्कल लढवत सुहानाला योग्य दिशा दाखवली आहे.

'द आर्चीज' मध्ये सुहानाने व्हेरोनिका हे पात्र साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. शिवाय पहिल्याच सिनेमात सुहानाने लिपलॉक सीन दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुहाना लवकरच शाहरुख खानसोबत आगामी ऍक्शन सिनेमात दिसणार आहे. 'कहानी' फेम सुजॉय घोष सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खाननेटफ्लिक्सबॉलिवूड