Join us  

'इडली वडा राम चरण कहा है तू?' शाहरुखने केला दाक्षिणात्य सुपरस्टारचा अपमान, नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 9:37 AM

अंबानींच्या पार्टीत घडला प्रकार, स्टेजवरुनच शाहरुखने राम चरणला मारली अशी हाक; सुपरस्टारची मेकअप आर्टिस्टही चिडून निघून गेली

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) अडचणीत सापडला आहे. साऊथ सुपरस्टार रामचरणला (Ram charan) 'इडली' अशी हाक मारल्याने नेटकरी शाहरुखवर नाराज आहेत. अंबानींच्या पार्टीत स्टेजवर शाहरुख सलमान आणि आमिर या तीनही खानने रामचरणच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स केला. स्टेप जमत नसल्याने पार्टीत हजर असणाऱ्या अभिनेता रामचरणला तिघांनी आवाज दिली. यावेळी शाहरुखने एक तर त्याला 'रामचरण कुठे आहे तू' अशी हाक मारली. इतकंच नाही तर त्याचा उल्लेख 'बेंड इडली वडा रामचरण' अशी हाक मारली. यामुळे आता शाहरुखवर नेटकरी आणि रामचरणचे चाहते नाराज झालेत.

शाहरुख खानवर सध्या Racist कमेंट केल्याचा आरोप होतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार आहे म्हणून त्याचा 'इडली वडा' असा उल्लेख करणं कितपत योग्य आहे? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. अंबानींच्या पार्टीत शाहरुखने कितीही मजा मस्तीच्या मूडमध्ये हे केलं असलं तरी चाहत्यांना मात्र हा साऊथ सुपरस्टारचा अपमानच वाटला आहे. 

इतकंच नाही तर रामचरणची मेकअप आर्टिस्ट झेबा हसन शाहरुखचं वाक्य ऐकताच तिथून निघून गेली. तिने इन्स्टाग्रावर शेअर करत लिहिले,"भेंड इडली वडा राम चरण कहा है तू?' हे ऐकून मी तिथून बाहेर पडले.राम चरणसारख्या सुपरस्टारचा हा अपमान आहे."

सोशल मीडियावर सध्या नेटकरी शाहरुखला खडेबोल सुनावत आहे. तर दुसरीकडे शाहरुखच्या चाहत्यांनी मात्र त्याचा बचाव केला आहे. 'एका दाक्षिणात्य दिग्दर्शकामुळेच करिअरचा सर्वात मोठा हिट सिनेमा दिला आणि आता तोच राम चरण इडली म्हणत दक्षिण भारतीयांवर वर्णद्वेषी कमेंट करत आहे'अशी कमेंट केला युझरने केली आहे.

टॅग्स :शाहरुख खानराम चरण तेजाTollywoodसोशल मीडियाट्रोल