Join us

सनी देओलने नाकारलेल्या सिनेमातून शाहरुख खान बनला सुपरस्टार, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:29 IST

Sunny Deol and Shah Rukh Khan : सनी देओलने एक चित्रपट नाकारला आणि या चित्रपटाची ऑफर शाहरुख खानला मिळाली. या चित्रपटातून किंग खान स्टार झाला.

तुम्हाला जर ९० च्या दशकातील गाणी आणि चित्रपट आवडत असतील तर तुम्ही 'दीवाना' (Deewana) चित्रपटातील 'ऐसी दिवानगी देखी नहीं कभी' हे गाणे ऐकले असेल. शाहरुख खान, ऋषी कपूर आणि दिव्या भारती अभिनीत हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यातील गाण्यांनी रेकॉर्ड तोडले. हे गाणे त्याकाळी प्रत्येक गल्लीत आणि बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळाले होते. चित्रपटाचे दोन्ही नायक शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) एकमेकांना भिडले होते. हे गाणे १९९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक विनोद राठोड यांनी गायले आहे आणि हे गाणे शाहरुख खान आणि ऋषी कपूर यांच्यातील तणावाचे कारण बनले. एवढेच नाही तर या हिट चित्रपटासाठी शाहरुख खान चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.  सनी देओल(Sunny Deol)ला या चित्रपटाची ऑफर पहिल्यांदा दिली होती. मात्र त्याने हा चित्रपट नाकारला.

ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांचा 'दीवाना' हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. दीवाना हा बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपटांपैकी एक आहे, जो अजूनही लोकांना पाहायला आवडतो. चित्रपटाची कथा असो वा गाणी, त्यांना खूप आवडले. या चित्रपटाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई करून निर्मात्यांना श्रीमंत केले. या चित्रपटात ऋषी कपूर आणि दिव्या भारती मुख्य भूमिकेत होते. ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६ कोटी रुपयांचे दमदार कलेक्शन केले.

सनी देओलला होती पहिली पसंती

या चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेसाठी सनी देओल निर्मात्यांची पहिली पसंती होती, परंतु त्याने नकार दिला. यानंतर शाहरुख खानने ही भूमिका केली. सनी देओलच्या नाकारलेल्या चित्रपटाने शाहरुख रातोरात सुपरस्टार झाला. वृत्तानुसार, सनीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरुख खानची शिफारस निर्मात्यांकडे केली होती. काही इतर रिपोर्ट्सनुसार, सनीच्या नकारानंतर अभिनेता अरमान कोहलीला देखील निर्मात्यांनी संपर्क साधला होता, परंतु निर्मात्या शबनम कपूरसोबत अरमानच्या काही वैयक्तिक समस्येमुळे त्याला चित्रपटातून बाहेर पडावे लागले.

गाण्यावरून निर्माण झाला होता पेचप्रसंग

१९९०च्या दशकात गायक विनोद राठोड अनेक बड्या स्टार्सचा आवाज असायचा. त्या काळात विनोद राठोड यांचं नाव आणि त्यांची गाणी इंडस्ट्रीत इतकी हिट होती की, प्रत्येक अभिनेत्याला स्वतःचा आवाज देऊन पडद्यावर हिट व्हायचं होतं. अशा परिस्थितीत विनोद राठोड यांनी गायलेले गाणे या चित्रपटासाठी त्याच्यावर चित्रीत व्हावे, अशी शाहरुखची इच्छा होती, परंतु हे गाणे त्याच्यावर चित्रीत व्हावे, अशी ऋषी कपूर यांची इच्छा होती. या प्रकरणाचा तणाव इतका वाढला की चित्रपटाच्या निर्मात्या शबनम यांना हस्तक्षेप करावा लागला. हे गाणे शाहरुखवर चित्रीत करायचे असे शबनमने ठरवले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटासोबत हे गाणेही सुपरहिट झाले.

टॅग्स :सनी देओलशाहरुख खानऋषी कपूर