Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पठान' सोडा, शाहरुख खान-अल्लू अर्जुन यांच्यात येथे सुरू आहे जबरदस्त फाईट; बघा कुणी मारली बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 04:14 IST

शाहरुख खानसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे...

सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावरील कमबॅकने सर्वांनाच आश्चर्य चकित केले आहे. त्याच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचेही जबरदस्त कौतुक होत आहे. यातच, शाहरुख खानसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

शाहरुख बॉक्स ऑफिस शिवाय इतर प्लॅटफॉर्मवरही राज्य करताना  दिसत आहे. अमॅझॉन फायर टीवी स्ट्रीमिंग ट्रेंडच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान हा अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्यासह 2022 मध्ये भारतात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. याच बरोबर, याच रिपोर्टनुसार तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा देखील शाहरुखला टक्कर देताना दिसला. कारण त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज' या यादीत सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट होता.

यानंतर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' आणि 'द काश्मीर फाइल्स' होता. या यादीत युजर्सनी हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली अशा एकूण 12 हून अधिक भाषांमधील सामग्रीचा आनंद घेतला.फॅमिली टाइमचा विचार करता, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने सर्च कॅटेगिरीमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. यानंतर, अभिनेत्री रूपाली गांगुलीच्या 'अनुपमा' आणि 'इंडियन आयडॉल'चा क्रमांक लागतो.

अमॅझॉन डिव्हाइसेस इंडियाचे संचालक आणि कंट्री मॅनेजर पराग गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या आपल्या एका निवेदनात म्हटले होते, 2022 ने ग्लोबल गेमच्या इतिहासात काही सर्वात मोठे क्षण पाहिले आहेत. तसेच त्यांनी अनेक ओटीटी स्ट्रिमिंग सोवांसोबत फायर टीव्हीच्या माध्यमाने ते आनंदाचे क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानअल्लू अर्जुनबॉलिवूड