Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर शेखच्या उपस्थिती सेटवर झाला होम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:08 IST

 ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे या मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत शाहीर शेख दिसणार आहे

 ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे. 'ये रिश्ते है प्यार के  उत्तम कथानक आणि स्टारर कास्टला घेऊन चर्चेत आहे. या शो चे निर्माते राजन शाही यांनी ‘ये रिश्ते है प्यार के’ च्या सेटवर ह्या शो चा नायक शाहीर शेखसोबत हवन केला.

सूत्रांनुसार, “हा शोचे निर्माते राजन शाही यांना अतिशय प्रिय असून आपला हा नव्या शो यशस्वी होण्यासाठी त्यांनी सेटवर हवन केला. ह्या शो नायक शाहीर शेख आणि नवीन कलाकारांपैकी काही सदस्य ह्यावेळी उपस्थित होते. त्यांचा असा विश्वास आहे की त्यामुळे सकारात्मकता येईल आणि शो ची चांगली सुरूवात होईल. त्यांना आशा आहे की ‘ये रिश्ते है प्यार के’ त्यातील उत्तम व्यक्तिरेखा आणि ताज्या दमाची कथा यांमुळे प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल.” ह्या शोमध्ये अभिनेत्री रिहा शर्मा नायिकेच्या तर शाहीर शेख नायकाच्या रूपात आहेत आणि ते हा सकारात्मक विचार पुढे आणतील की लग्न हा एक नीट विचार करून करण्याचा निर्णय आहे आणि तो घाईघाईने घेतला जाऊ नये. प्रेक्षकांना हा शो निश्चितपणे आवडेल.

 या मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत शाहीर शेख असून अभिनेत्री  रिया शर्मा ही त्याची नायिका असेल. आता या मालिकेची रंजकता वाढविण्यासाठी नामवंत अभिनेत्री रुपल पटेल ही त्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस