Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेत्यानं तिरुपतीचं घेतलं दर्शन, धार्मिक मुद्द्यावरुन झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:50 IST

रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेत्यानं तिरुपतीचं दर्शन घेतल्यानं त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

'महाभारत' (Mahabharata) या हिट पौराणिक मालिकेने केवळ ज्ञानात भर टाकली नाही तर आयुष्यभराच्या आठवणीही दिल्यात. 'महाभारत' मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. अलीकडेच 'महाभारत' मालिकेतील शाहीर शेख (Shaheer Sheikh), सौरव गुर्जर, अहम शर्मा, अर्पित रांका आणि ठाकूर अनुप सिंग या कलाकारांनी रीयूनियन केलं. त्यांच्या भेटीचे काही फोटो शाहिर शेख याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, त्याला ट्रोलिंगचा सामोरे जावं लागलं आहे. 

'महाभारत' मालिकेतील या कलाकारांनी तिरुपतीचं दर्शन घेतलं. यावेळी शाहीर शेख आणि अहम शर्माने दाक्षिणात्या लूक केला होता. पण, रमजान (Ramadan) महिन्यात शाहीर याने मंदिरात जाणे काही लोकांना आवडले नाही. अनेक जण त्याला धर्माचे धडे शिकवतानाही दिसले. 

 शाहीर शेख याने 'महाभारत' मालिकेत अर्जुनची भूमिका केली होती. मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.  'महाभारत' ही मालिका १६ सप्टेंबर २०१३ ते १३ ऑगस्ट २०१४ या कालावधीत प्रसारित झाली होती. ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती.  

टॅग्स :शाहीर शेखमहाभारतरमजानसेलिब्रिटी