Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्लॅम वर्ल्ड’मध्ये सुहाना खानची ग्रॅण्ड एन्ट्री! ‘वोग’साठी केले हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 10:25 IST

होय, वोग इंडियासाठी सुहानाने तिचे पहिले फोटोशूट केले. या बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूटमध्ये सुहानाचा अंदाज नेक्स्ट सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

जान्हवी कपूरनंतर आणखी एक ‘स्टार डॉटर’ बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात एन्ट्री घेतेय. वोग इंडिया या जगप्रसिद्ध फॅशन मॅगझिनच्या आॅगस्ट महिन्याच्या अंकाच्या कव्हर पेजवर झळकलेल्या या ‘स्टार डॉटर’ ने सर्वांना वेड लावले आहे. ही ‘स्टार डॉटर’ कोण तर किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना खान. होय, वोग इंडियासाठी सुहानाने तिचे पहिले फोटोशूट केले. या बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी फोटोशूटमध्ये सुहानाचा अंदाज नेक्स्ट सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

आपल्या पहिल्या फोटोशूटमध्ये सुहाना कमालीची ग्लॅमरस दिसतेय. तिच्या चेह-यावरचा आत्मविश्वासही पाहण्यासारखा आहे. तो बघता, लवकरच सुहाना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, हे सांगायला कुण्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

सुहानाची आई गौरी खान हिने सुहानाच्या या फोटोशूटचा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. शाहरूखनेही लेकीला ग्लॅमर वर्ल्डमध्ये एन्ट्री देणा-या वोग इंडियाचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. जान्हवीपाठोपाठ ही संधी सुहानाला मिळालीय.  सध्या बॉलिवूडच्या अनेक पार्टींमध्ये, कार्यक्रमात सुहाना  पाहायला मिळते.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील ती खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत.  करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानसुहाना खान