आणखी एक स्टार किड ठोठावतेय बॉलिवूडचे दरवाजे,१८व्या वाढदिवशी तिच्या ग्लॅमरस अदांची होते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 07:40 AM2018-05-22T07:40:25+5:302018-05-22T13:10:25+5:30

या फोटोमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधूून घेतोय. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सज्ज होत असल्याचे सांगत गौरीने करण जोहरचे विशेष आभार मानलेत.

Another Bollywood star, who is knocking on a star kid, discusses her glamorous adolescence on the 18th birthday. | आणखी एक स्टार किड ठोठावतेय बॉलिवूडचे दरवाजे,१८व्या वाढदिवशी तिच्या ग्लॅमरस अदांची होते चर्चा

आणखी एक स्टार किड ठोठावतेय बॉलिवूडचे दरवाजे,१८व्या वाढदिवशी तिच्या ग्लॅमरस अदांची होते चर्चा

googlenewsNext
-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आय् वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर लवकरच धडक सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे. या सिनेमाची आणि जान्हवीच्या पदार्पणाची जोरदार चर्चा सुरु असताना आणखी एक स्टार किड बॉलिवूडचे दरवाजे ठोठावते आहे. ही स्टार किड म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान आहे. शाहरुखची लेक सुहाना आता १८ वर्षांची झाली आहे. 22 मे 2000 रोजी मुंबईत सुहानाचा जन्म झाला. सुहानाच्या  वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिची आई गौरी खान हिने सुहानाचा एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधूून घेतोय. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सज्ज होत असल्याचे सांगत गौरीने करण जोहरचे विशेष आभार मानलेत. करणला बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. अनेक नव्या कलाकारांना करणने आपल्या सिनेमातून पदार्पणाची संधी दिली आहे. त्यातच करण आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे करणच्या आगामी सिनेमातून सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.
 
सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो वा-यासारखा व्हायरल होत असतो.असाच सुहानाचा एक फोटो तिची आई गौरीने शेअर केला. हा फोटो शेअर करताना गौरीने त्याच्या कॅप्शनमध्ये ‘Having the time of your life in your teens ...’ असे लिहिले. सुहानाचा हा फोटो यूजर्सकडून चांगलाच पसंत केला जात आहे. त्याचबरोबर यूजर्सकडून तिचे कौतुकही केले जात आहे.एका यूजर्सनी लिहिले की, ‘सुहाना आपल्या वडिलांवर गेली आहे.’ तर दुस-या एका यूजरने लिहिले की, ‘सुहाना शाहरुखची कार्बन कॉपी आहे.’


 

Web Title: Another Bollywood star, who is knocking on a star kid, discusses her glamorous adolescence on the 18th birthday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.