Join us

Video: उदित नारायण यांनी गायलेल्या लाईव्ह गाण्यावर शाहरुखचा गौरीसोबत रोमँटिक डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 09:30 IST

शाहरुख खान - गौरीने उदित नारायण गात असताना रोमँटिक डान्स केलाय.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सोहळ्याची चांगलीच चर्चा झाली. प्री वेडींग सोहळ्यातले अनेक फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  शाहरुख - आमिर - सलमान या तिघांनी प्री वेडींग सोहळ्यात केलेला डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अशातच शाहरुखचा पत्नी गौरीसोबतचा रोमँटिक डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय. 

अनंत अंबानींच्या प्री - वेडिंग सोहळ्यात उदित नारायण यांनी शाहरुखच्याच गाजलेल्या 'वीर झारा' सिनेमातलं 'मै यहा हू यहा' गाणं गायलं. उदित नारायण लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना शाहरुखने गौरीचा हात धरुन रोमँटिक डान्स केला. शाहरुखचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे, शाहरुख प्री - वेडिंग सोहळ्यात 'छम्मक छल्लो' गाण्यावर सुद्धा जबरदस्त थिरकला.

अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा प्री वेडींग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि आंतरराष्ट्रीय कलाकार उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्सची सुद्धा जबरदस्त चर्चा रंगली. या सोहळ्यात शाहरुख - सलमान - आमिरच्या एकत्रित सादरीकरणाने सर्वांचंच मन जिंकलं.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानउदित नारायणअनंत अंबानी