Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शगुफ्ता यांचा सोनू सदूबद्दल मोठा खुलासा, मदत मागितली पण मिळाले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:43 IST

शगुफ्ता यांनी जवळपास 15 सिनेमा आणि 20 मालिकांमध्ये काम केले आहे. 1998-99 मध्ये आलेल्या 'सांस' या मालिकेतून प्रकाशझोतात आल्या होत्या.

टीव्ही मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शगुफ्ता सध्या  हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेल्या चार वर्षापासून त्या बेरोजगार आहेत. संपूर्ण बचत संपली आहे त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शगुफ्ता कर्करोगानेही ग्रस्त आहेत. त्यामुळे आता उपचारासाठीही त्यांच्याकडे  पुरेस पैसे शिल्लक नाहीत. 

शगुफ्ता आता ५४ वर्षांच्या आहेत. सध्या कोणतेच काम त्यांच्याकडे नाही. त्यामुळे घरातल्या वस्तूच विकून त्यांना गुजरान करावी लागत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शगुफ्ता यांना टिव्ही असोसिएशनकडेही मदत मागितली होती. पण जी मदत त्यांना देण्यात आली त्या पैस्यातून त्यांची कोणतची अडचण दूर होणार नव्हती. त्यामुळे शगुफ्ता यांनी मदत नाकारली. त्यांच्याकडून मिळणारे पैसे खूप कमी होते. 

त्यानंतर शगुफ्तानेही सोनूसूदकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. मी सोनू सूदकडेही संपर्क साधला होता. पण सोनू सूद केवळ सेवा करतो. आर्थिक अडचणीत सापडलेल्यांची मदत करत नाही. त्यामुळे त्यांची पुरती निराशाचा झाली. मला कोणाकडूनही उपचारासाठी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.

दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की,  काम मिळाले की सर्व अडचणी दूर होतील असे वाटत होते. गेल्या चार वर्षांपासून कोणतेही काम माझ्याकडे नाही. कोरोनामुळे तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. शेवटी मदत मागणे हाच पर्याय माझ्याकडे होता. पण तिथेचही पदरी निराशाच पडल्याचे त्यांनी सांगितले. 

शगुफ्ता यांनी  जवळपास 15 सिनेमा आणि 20 मालिकांमध्ये काम केले आहे. 1998-99 मध्ये आलेल्या 'सांस' या मालिकेतून प्रकाशझोतात आल्या होत्या. याशिवाय त्यांनी परंपरा, जुनून, द झी हॉरर शो, ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये आलेल्या बेपनाह या मालिकेत त्या शेवटच्या दिसल्या होत्या. 

टॅग्स :सोनू सूद