Join us

Video: मराठी अभिनेत्रीने धरली गावाकडची वाट; भातशेती करण्यात झाली दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 14:20 IST

Marathi actress: या अभिनेत्रीने सध्या कामातून ब्रेक घेतला असून ती शेती करण्यात बिझी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मुंबई, पुण्यासारखी मोठं शहरं सोडून गावाची वाट धरत आहेत. काही काळापूर्वीच भरत जाधव, मृण्मयी देशपांडे यांनी गावाकडे त्यांचा संसार थाटला आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती भातशेती करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री रश्मी अनपट हिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रश्मीने तिच्या कामामधून ब्रेक घेतला असून सध्या ती शेतीच्या कामात रमली आहे. हा व्हिडीओ रश्मीने शेअर केला आहे. यात ती चिखलात उभी राहून भाताची लावी करत आहे. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावर शेती करतानाचा आनंद दिसत आहे.

दरम्यान, रश्मीचा हा व्हिडीओ पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही कमेंट केली आहे. रश्मी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यात सध्या ती  सन मराठीच्या 'शाब्बास सूनबाई' या मालिकेत काम करत आहे. 

टॅग्स :रश्मी अनपटसेलिब्रिटीटेलिव्हिजन