Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित जावेद अख्तर यांच्या प्रेमात पडल्या होत्या शबाना, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 11:50 IST

शबाना आझमींसोबत लग्न करण्याआधी जावेद यांचं अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत लग्न झाले होते.

असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी प्रेमासाठी जगाची सगळी बंधनं झुगारली. अनेक प्रयत्न करुनही त्यांना कुणी वेगळं करु शकलं नाही.  शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची जोडी अशांपैकीच एक आहे. शबाना आझमी विवाहीत जावेद अख्तर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यात. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम

पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यात. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. 1984 मध्ये जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ‘तलाक’ देत शबानांशी लग्न केले. जावेद आधीच विवाहित होते, याचदरम्यान जावेद आणि त्यांची पत्नी हनी यांच्यातील मतभेद वाढले. शेवटी ते दोघेही वेगळे झालेत आणि शबाना व जावेद यांनी लग्न केले. जावेद कायम मला सेन्स आॅफ सिक्युरिटी देतो. तो माझ्या अब्बासारखा आहे. मग ती शायरी असो किंवा राजकारण वा सामाजिक मुद्दा तो परखडपणे बोलतो, असे शबाना आझमी जावेद यांच्याबद्दल बोलल्या होत्या.

जावेद यांचे लग्न झाले असल्यामुळे शबाना त्यांच्यापासून दूरच राहायच्या. पण एका पार्टीत शबानाच्या ‘स्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्या दिवसापासून त्यांच्यात संभाषणाला सुरुवात झाली. काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हनी यांच्या कानावर ही गोष्ट पोहोचताच घरात रोज भांडणे व्हायला लागली. पण जावेद आता आपल्यावर प्रेम करत नाहीत याची हनी यांना जाणीव झाल्याने त्यांनी जावेद यांना शबानाकडे जायला सांगितले. लग्नाच्या सातच वर्षांत हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतला. हनीसोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच जावेद आणि शबाना यांनी लग्न केले.

टॅग्स :शबाना आझमीजावेद अख्तर