Join us

Vijay Deverakondaला पाहून गर्दी अनियंत्रित; बेशुद्ध झाल्यात फिमेल फॅन्स, रद्द करावा लागला इव्हेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:36 IST

Liger Promotion : विजय देवरकोंडाला पाहायला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की, मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. विजय स्टेजवर येताच गर्दी अनियंत्रित झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

Vijay Deverkonda Fans Fainted: साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या ‘लाइगर’ (Liger ) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. देशातल्या वेगवेगळ्या शहरात प्रमोशनल इव्हेंट होत आहेत आणि विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स गर्दी करत आहेत. मुंबईच्या एका मॉलमध्ये काल असंच काही बघायला मिळायल. विजय देवरकोंडाला पाहायला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की, मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. विजय स्टेजवर येताच गर्दी अनियंत्रित झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. इतकी की, अनेक फिमेल फॅन्स रडू लागल्या. काहींना चक्कर आली. अखेर इव्हेंट मध्येच रद्द करावा लागला. याचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लाइगरच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडा व अनन्या पांडे स्टेजवर येताच, फॅन्स विजय-विजय म्हणून ओरडू लागले. स्टेजकडे जाण्यासाठी धक्काबुक्की करू लागले. काहीच क्षणात सगळीकडे गोंधळ माजला. आयोजकांनाही गर्दी सांभाळणं कठीण झालं. बॅरिकेट्सला धक्का देत, फॅन्स स्टेजकडे सरकू लागले. विजय देवरकोंडाने आपल्या सगळ्या चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आयोजकांनीही सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 

मी इथेच आहे. कृपया शांत राहा. मी कुठेही जात नाहीये. प्लीज, काळजी घ्या. कोणलाही हर्ट व्हावं अशी माझी इच्छा नाही, असं विजय देवरकोंडा म्हणाला. पण गर्दी मानेना. अखेर सुरक्षा कारणास्तव विजय देवरकोंडा व अनन्या पांडे यांना इव्हेंट मध्येच सोडून स्टेजवरून बाहेर पडावं लागलं. चेंगराचेंगरीसारखी स्थिती बघता, आयोजकांनी इव्हेंट रद्द केला. यानंतर मात्र गर्दी नियंत्रणात आली.

शेअर केली इन्स्टास्टोरीमुंबईतील मॉलमधील फॅन्सचा हा क्रेझीनेस पाहून विजय देवरकोंडा काहीक्षण सुखावला असला तरी त्याने याबाबत चिंता व्यक्त केली. रात्री त्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक इन्स्टास्टोरी शेअर केली. ‘तुमचं प्रेम पाहून मला भरून आलं. आशा करतो, तुम्ही सगळे सुरक्षित असाल आणि आपआपल्या घरी सुखरूप पोहोचले असाल. काश, मी तुमच्यासोबत आणखी थोडा वेळ घालवू शकलो असतो. बेड वर पडतांना तुमच्याबद्दल विचार करतोय. गुडनाईट मुंबई....,’अशी स्टोरी त्याने शेअर केली. 

टॅग्स :विजय देवरकोंडाअनन्या पांडेबॉलिवूडमुंबई