Siddharth Malhotra-Kiara Advaniचं नातं पाहून कंगनाला आठवलं तिचं बॉलिवूडमधलं पहिलं प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:27 IST
Siddharth Malhotra-Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही ६ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत.
Siddharth Malhotra-Kiara Advaniचं नातं पाहून कंगनाला आठवलं तिचं बॉलिवूडमधलं पहिलं प्रेम
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघेही ६ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतनने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचे कौतुक करत त्यांना बॉलिवूडचे अप्रतिम जोडपे म्हटले आहे.
कंगना राणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच, कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा व्हिडिओ शेअर करताना या जोडप्याचे कौतुक केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की 'ही जोडी खूप छान आहे, आम्हाला चित्रपटसृष्टीत खरे प्रेम क्वचितच पाहायला मिळाले. दोघेही एकत्र सुंदर दिसत आहेत.
कंगना राणौतची ही पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचे कंगनाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर कंगनाचे खूप कौतुक होत आहे. काही वर्षांपूर्वी कंगना हृतिक रोशनला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. क्रिश ३ च्या सिनेमादरम्यान या दोघांचे प्रेम जुळले अशा चर्चा सुरु झालेल्या. दोघांचा एका पार्टीतला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हृतिकने या सर्व गोष्टी नाकारला. व्हायरल झालेला फोटो हा एडिट केलेला आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असे हृतिक म्हणाला होता. त्यामुळे सिद्धार्थ - कियारा निमित्ताने कंगनाला तिचे जुने प्रेम आठवले असेल.
६ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतील. ४ फेब्रुवारीपासून प्री वेडिंग फंक्शन सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याचा संगीत सोहळा ५ फेब्रुवारीला होणार आहे. ७ फेब्रुवारीला रिसेप्शन होणार आहे.