Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर असलेल्या रिचाला पाहताच रेखा यांनी केलेल्या 'या' कृतीने अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 14:04 IST

रेखा यांनी गरोदर असलेल्या रिचासाठी केलेल्या या कृतीने सर्वांचंच मन जिकलंय. रेखा यांनी काय केलंय बघा

रेखा या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार रेखा यांना आदरणीय मानतात. रेखा या अनेक पार्टी, इव्हेंटमध्ये आवर्जुन सहभागी होतात. याशिवाय दिलखुलासपणे सर्व कलाकारांना रेखा भेटत असतात. रेखा यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 'हीरामंडी'च्या इव्हेंटमध्ये रेखा सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी गरोदर असलेल्या रिचाला पाहताच रेखा यांनी केलेल्या एका खास कृतीने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

'हीरामंडी'चा प्रीमियर शो नुकताच मुंबईत झाला. या प्रीमीयरला 'हीरामंडी'मधील अभिनेत्री रिचा चढ्ढा उपस्थित होती. याशिवाय रेखा सुद्धा कलाकारांना आशिर्वाद देण्यासाठी या प्रिमियरला हजर होत्या. त्यावेळी रिचाला पाहताच रेखा यांनी तिचा हात हातात घेतला. याशिवाय खाली झुकून तिच्या बेबी बंपला किस केलं. रेखा यांनी अनपेक्षितपणे केलेल्या या कृतीने रिचा खुपच भावूक झालेली दिसली.

रिचा - रेखा यांचं खास बॉन्डिंग 'हीरामंडी'च्या प्रिमियरला पाहायला मिळालं. 'हीरामंडी'बद्दल सांगायचं तर संजय लीला भन्सालींचा हा महत्वांकाक्षी प्रोजेक्ट आहे. सत्य घटनेवर आधारीत ही वेबसिरीज १ मे २०२४ ला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या वेबसिरीजमध्ये रिचा चढ्ढा, फरदीन खान, आदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, शेखर सुमन यांच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :रिचा चड्डारेखासंजय लीला भन्साळीआदिती राव हैदरी