बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ज्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहे, त्याचा एक फोटो समोर आला आहे. आरोपी मुंबईतच फिरताना आढळून आला असून, त्याने कपडेही बदलल्याचे नव्या व्हिडीओत दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. सैफ अली खानच्या घरात जाताना आणि हल्ल्यानंतर बाहेर पडताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
वांद्रे स्थानकावरील सीसीटीव्हीत दिसला संशयित
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी घटनेनंतर पसार झाला. याच दरम्यान, त्याने कपडे बदलले. त्यानंतर तो वांद्रे स्थानकावर गेला. जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात संशयित आरोपी हाताची घडी घालून चालताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे स्थानकाबाहेर परिसरात तो फिरत होता. त्याचवेळी तो एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. संशयित आरोपीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग आहे. हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी सदर परिसरात चौकशीही सुरू गेली आहे.
दोन सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांकडे
सैफ अली खान मुंबईतील खार स्थितअसलेल्या गुरू शरण अपार्टमेंटमध्ये १२व्या मजल्यावर राहायला आहे. याच घरात घुसून आरोपीने हल्ला केला. सैफ अली खानवर चाकून ६ वार करण्यात आले. यावेळी झालेल्या झटापटीत चाकू सैफ अली खानच्या पाठीत घुसला होता.