महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे. होय, ‘एक था टायगर’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खुद्द दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी याबाबतचा खुलासा केला.पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अली अब्बास या चित्रपटावर बोलला. ‘एक था टायगर’च्य तिसºया पार्टवर काम सुरु झाले आहे. सलमान आणि मी येत्या काही दिवसांत या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहोत. सध्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. कथा तयार आहे. माझ्यासोबतच सलमानही या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सुक आहे. आम्हा दोघांमध्ये एक चांगला बॉन्ड तयार झाला आहे. आता आमच्यात भावांसारखे नाते निर्माण झाले आहे, असे अलीने यावेळी सांगितले.
भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 10:17 IST
महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे.
भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!!
ठळक मुद्देतूर्तास सलमान ‘दबंग 3’मध्ये बिझी आहे. हा सिनेमा हातावेगळा केल्यानंतर भाईजान संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’चे शूटींग करणार आहे.