अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjiv) मराठी मालिका (Marathi Serials) आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. अभिनयाचा ठसा उमटवलेल्या सायलीचा चाहता वर्गही मोठा आहे. सायली सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळते. नुकतेच तिने वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सायली संजीवचा आज वाढदिवस आहे. आज सायली तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सायलीनं वाढदिवसानिमित्त वडिलांच्या आठवणीत एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत सायली तिच्या वडिलांच्या फोटोकडे अगदी प्रेमाना पाहताना दिसतेय. सायलीनं या फोटोसोबत "मिस यू" असं म्हटलं आहे.
सायलीचा जन्म ३१ जानेवारी रोजी १९९३ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला आहे. सायलीच्या नावातील संजीव हे आडनाव नसून तिच्या वडीलांचे नाव आहे. सायली वडील हे तहलसीलदार होते. २०२१ मध्ये ३० नोव्हेंबरला तिच्या वडीलांचं निधन झालं होतं. सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'काहे दिया परदेस', 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत काम केलं आहे. ती 'झिम्मा' या चित्रपटातही झळकली होती.