Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकता कपूरची सिरियल! सुरुचीचा नागीण अवतार आणि VFX मुळे 'सातव्या मुलीची...' मालिका ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 16:16 IST

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. झी वाहिनीवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेत नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची एन्ट्री झाली आहे. सुरुचीच्या एन्ट्रीने या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत सुरुची नागिणीची भूमिका साकारत आहे. 

सुरुचीच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सुरुची नागीण अवतारात दिसत आहे. पण, यातील व्हीएफएक्स आणि कथानकामुळे या मालिकेवर प्रेक्षक नाराज आहेत. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 

काहींनी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेची तुलना एकता कपूरच्या मालिकेबरोबर केली आहे. एकाने कमेंट करत "या सिरियलला नागीण सिरियलचा लूक का दिलाय? मराठी मालिकेला हे शोभत नाही", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "हसायला येतंय" असं म्हणत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनेकांनी "फनी स्क्रिप्ट" म्हणत या मालिकेची खिल्ली उडवली आहे. "किती फालतू सिरीयल आहे, बंद करा", अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. "अरे देवा...खतरनाक व्हीएफएक्स" असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सुरुचीची एन्ट्री झाल्याने या मालिकेने वेगळं वळण घेतलं आहे. विरोचकाची सेवक असलेल्या नागिणीने आता घरात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे मालिका अधिक रंजक झाली आहे. 

टॅग्स :सुरुची आडारकरटिव्ही कलाकारझी मराठी