Join us

साडी, केसात गजरा अन् भांगेत कुंकू, वीणा जगताप पडली पुन्हा प्रेमात?; पोस्टनं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:13 IST

Veena Jagtap : वीणा जगतापच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून वीणा जगताप (Veena Jagtap) ओळखली जाते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणा घराघरात पोहोचली. सर्वात जास्त वीणा बिग बॉस मराठीच्या घरात असताना चर्चेत आली होती. ती बिग बॉस मराठी शोमध्ये असताना तिच्यात आणि शिव ठाकरेमध्ये प्रेम फुलले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीरही केले होते. मात्र नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर वीणा जगताप पुन्हा प्रेमात पडली असल्याचे बोलले जात आहे. तिची पोस्ट पाहून चाहते ती पुन्हा प्रेमात पडल्याचा तर्क लावत आहेत. 

वीणा जगताप ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते आणि ती माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच वीणाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने साडीतले दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती छान चॉकलेटी रंगाची साडीत दिसते आहे. त्याबरोबर तिने गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपारिक साजही केला आहे. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या भांगेत कुंकू पाहायला मिळत आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ‘प्यार हुआ,,,,इकरार हुआ’. तसेच  तिने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

वीणा जगतापची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की,‘कोण आहे तो नशीबवान मुलगा, ज्याची तू पत्नी होणार आहे’. तर काहींनी तिला ‘तू खूप सुंदर दिसतेस’, असे म्हणत कमेंट केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी वीणाने अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. त्यानंतर तिने गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत नवीकोरी गाडी खरेदी केली होती. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. 

टॅग्स :वीणा जगतापशीव ठाकरेबिग बॉस मराठी