Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सारा अली खानने पापाराझींना केले खूश्श, लिहिले स्वहस्तलिखित पत्र!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 10:45 IST

‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे सारा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतेय. पण बॉलिवूड डेब्यूआधीच कुणाचे मन कसे जिंकायचे, हे कदाचित साराला कळलेय.

ठळक मुद्देहोय, साराने सर्व पापाराझींना एक स्वहस्तलिखित पत्र पाठवून त्यांना कॉफीसाठी आमंत्रित केले आहे. पापाराझींना व्यक्तिश: भेटून तिला त्यांचे आभार मानायचे आहेत. 

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट  येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सारा व सुशांत सिंग राजपूत लीड रोलमध्ये आहेत. साराचा हा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे सारा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतेय. पण बॉलिवूड डेब्यूआधीच कुणाचे मन कसे जिंकायचे, हे कदाचित साराला कळलेय.  साराने आपल्या अशाच एका कृतीने मीडियाची मने जिंकली आहेत. होय, साराने सर्व पापाराझींना एक स्वहस्तलिखित पत्र पाठवून त्यांना कॉफीसाठी आमंत्रित केले आहे. पापाराझींना व्यक्तिश: भेटून तिला त्यांचे आभार मानायचे आहेत. 

 डेब्यूआधी मला इतके महत्त्व दिलेत, त्याबद्दल मला तुमचे भेटून आभार मानायचे आहेत. तुम्ही बिझी असता, हे मी जाणते. पण माझ्यासाठी थोडा वेळ काढता आला तर मी आभारी असेल, असे साराने आपल्या पत्रात लिहिले आहे. साराचे हे पत्र पाहून फोटोग्राफर्सही सुखावले आहे. साराने स्वत: पत्र लिहावे आणि कॉफीसाठी बोलवावे, याबद्दल पापाराझींनी आनंद व्यक्त केला आहे. एकंदर काय तर आपल्या या कृतीने पापाराझींची मने जिंकली आहेत. आहे ना सारा वयापेक्षा अधिक प्रगल्भ...‘केदारनाथ’नंतरसारा अली खान रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये झळकणार आहे. या मसाला चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग साराचा हिरो आहे. विशेष म्हणजे, या दोन चित्रपटानंतर एक तिसरा चित्रपटही साराच्या झोळीत पडला आहे. म्हणजेच ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच साराने इम्तियाज अलीचा ‘लव आज कल 2’हा तिसरा सिनेमा साईन केला आहे.  इम्तियाजने या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साईन केले आहे आणि आता त्याच्या अपोझिट साराला साईन केल्याचे कळतेय. साराचा अंदाज इम्तियाजला इतका भावला आहे की, आपल्या या चित्रपटासाठी ती एकदम परफेक्ट असल्याचे त्याचे मत आहे.

 

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथसैफ अली खान