Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’ रिलीज होण्यापूर्वीच सारा अली खानने साईन केला तिसरा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:49 IST

होय, ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच साराने तिसरा सिनेमा साईन केला आहे.

ठळक मुद्दे‘लव आज कल’मध्ये साराचे पापा सैफ अली खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली होती. आता ‘लव आज कल’चा सीक्वल इम्तियाज घेऊन येतोय आणि यात सैफ अली खानची लेक सारा मुख्य भूमिकेत असणार आहे.

सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा पहिला सिनेमा ‘केदारनाथ’ प्रदर्शनाच्या तोंडावर आहे. या चित्रपटात सारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि साराने अनेकांची मने जिंकलीत. ट्रेलरमधील तिचा अभिनय पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले.

केदारनाथ’नंतरसारा अली खान रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये झळकणार आहे. या मसाला चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग साराचा हिरो आहे. विशेष म्हणजे, या दोन चित्रपटानंतर एक तिसरा चित्रपटही साराच्या झोळीत पडला आहे.

होय, म्हणजेच ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच साराने तिसरा सिनेमा साईन केला आहे. फिल्मफेअरची ताजी बातमी खरी मानाल तर इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’मध्ये साराची वर्णी लागली आहे. इम्तियाजने या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साईन केले आहे आणि आता त्याच्या अपोझिट साराला साईन केल्याचे कळतेय. साराचा अंदाज इम्तियाजला इतका भावला आहे की, आपल्या या चित्रपटासाठी ती एकदम परफेक्ट असल्याचे त्याचे मत आहे.तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘लव आज कल’मध्ये साराचे पापा सैफ अली खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली होती. आता याच चित्रपटाचा सीक्वल इम्तियाज घेऊन येतोय आणि यात सैफ अली खानची लेक सारा मुख्य भूमिकेत असणार आहे. आता साराचा अंदाज शिवाय सारा-कार्तिकची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पे्रक्षकांना किती पसंत येतो, ते बघूच.तूर्तास इम्तियाज अली  ‘लव आज कल 2’च्या स्क्रिप्टिंगमध्ये बिझी आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होईल. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच... 

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथसिम्बा