आजच्या घडीला तिला बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सारा अली खान हिला ओळखलं जातं. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त सारा तिच्या सोशल मीडियाद्वारे सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. अभिनेत्रीचा साधाभोळा अंदाज तिच्या चाहत्यांना कायम भावतो. सारा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचे लक्ष असते. यातच आता अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत राजस्थानमध्ये व्हॅकेशनवर असल्याची माहिती आहे.
सारा अलीच्या खाजगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सारा ही अर्जुन प्रताप बाजवाला डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकतेच सारा आणि अर्जुन हे राजस्थानमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसलेत. दोघांनीही हॉटेलमधून आपले फोटो शेअर केले आहेत. एकीकडे सारा राजस्थानी वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहे, तर दुसरीकडे अर्जुन प्रताप बाजवाने हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून दोघे एकत्र असल्याचा चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. यापूर्वी सारा अली खान हिचे अर्जूनसोबतचे केदारनाथमधील फोटो व्हायरल झाले होते.
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'स्काय फोर्स' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा अली खान पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यापूर्वी दोघेही 'अतरंगी रे'मध्ये दिसले होते. याशिवाय अभिनेत्रीकडे अनुराग बासूच्या दिग्दर्शनाखाली 'मेट्रो इन दिनों' हा चित्रपटही आहे.