अभिनेत्री सारा अली खानची एक रिअॅक्शन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सारा नुकतीच 'पती पत्नी और वो २'च्या ट्रेलर लाँचला आली होती. तिथे एका होस्टच्या विचित्र विधानावरुन ती चांगलीच शॉक झाली. 'हा काय बोलतोय?' असं तिच्या एकंदर हावभावावरुन दिसत होतं. तिच्यासोबत रकुल प्रीत सिंह आणि आयुष्मान खुरानाही होते. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू दिसत होतं. नक्की काय घडलं पाहा.
'पती पत्नी और वो २'च्या ट्रेलर लाँचवेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सारा अली खान ब्लॅक शॉर्ट वनपीसमध्ये बसली आहे. तर तिच्या बाजूला रकुल प्रीत सिंह आणि दुसऱ्या बाजूला आयुष्मान खुराना आहेत. तिघेही स्टेजवर होस्ट काय बोलतोय त्याकडे लक्ष देत आहेत. त्यातच होस्ट म्हणतो, 'पापाराझी रील पोस्ट करतात ज्यात सेलिब्रिटींना बॅकशॉट वरुन ओळख कोण? असं विचारतात. मी खोटं सांगत नाही...मी सर्व सेलिब्रिटींना मागून पाहून ओळखतो. भले समोरुन ओळखणार नाही पण मागून ओळखतो. हे माझं कौशल्य आहे. मी या कामात खूप वेळ घालवला आहे. मी याचा खूप सराव करतो.' बॉलिवूड हेल्पलाईन पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
होस्टच्या या विचित्र वक्तव्यावर सारा चांगलीच शॉक झाली. ती रकुलला म्हणाली,'हा काय बोलतोय?' तिच्यावर चेहऱ्यावर हसू असलं तरी काहीशी नाराजी दिसत होती. मात्र तरी तिने हसून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तर रकुल आणि आयुष्मानही हसताना दिसले.
'पती पत्नी और वो २' १५ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा रोमकॉम सिनेमा आहे. मुदस्सर अजीजने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २०१९ मध्ये आलेला 'पती पत्नी और वो' ही चांगलाच गाजला होता. त्यामध्ये कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर होते.
Web Summary : Sara Ali Khan was visibly shocked by a host's inappropriate comment at the 'Pati Patni Aur Woh 2' trailer launch. The host's remark about recognizing celebrities from behind left Sara, along with Rakul Preet Singh and Ayushmann Khurrana, surprised.
Web Summary : 'पति पत्नी और वो 2' के ट्रेलर लॉन्च पर एक होस्ट के अजीब कमेंट से सारा अली खान हैरान रह गईं। होस्ट की टिप्पणी पर सारा, रकुल प्रीत सिंह और आयुष्मान खुराना भी हैरान दिखे।