Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानने सांगितलं सुशांतसोबत ब्रेकअपचं कारण, म्हणाली - 'तो लॉयल नव्हता'

By अमित इंगोले | Updated: September 28, 2020 10:02 IST

इंटरनेटवर काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, साराने एनसीबीसमोर मान्य केलं होतं की, ती सुशांतला डेट करत होती आणि हेही सांगितलं की, दोघांचं ब्रेकअप का झालं होतं. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास आता बॉलिवूडमधील ड्रग्सच्या वापरापर्यंत येऊन पोहोचलाय. या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक टॉप अभिनेत्री जसे की, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीने समन्स पाठवला होता आणि या केसबाबत त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. इंटरनेटवर काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, साराने एनसीबीसमोर मान्य केलं होतं की, ती सुशांतला डेट करत होती आणि हेही सांगितलं की, दोघांचं ब्रेकअप का झालं होतं. 

काय म्हणाली होती सारा?

शुक्रवारी सारा अली खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी ड्रग्स केस आणि सुशांतबाबत तिची चार तास चौकशी करण्यात आली. असेही सांगितले जात आहे की, या चौकशीदरम्यान साराने सुशांतसोबतच्या नात्याची बाब मान्य केली आहे. pledgetimes.com ने साराने एनसीबीला दिलेल्या माहितीचे डीटेल्स देत म्हटले की, एनसीबीसमोर साराने हे मान्य केलं की, ती त्याला डेट करत होती.

...म्हणून झालं होतं दोघांचं ब्रेकअप?

वेबसाइटला मिळालेल्या माहितीनुसार, साराने एनसीबीला सुशांतसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. साराने सांगितले की, सुशांत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता. इतकेच नाही तर वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने हेही सांगितले की, सारा म्हणाली की, सुशांत त्यांच्या रिलेशनशिपबाबत फार पझेसिव्ह राहत होता आणि तसेच त्याची अशी इच्छा राहत होती की, साराने तिच्या फिल्ममेकर्सना त्यालाच तिच्या पुढील सिनेमात घेण्यासाठी तयार करावं.

तसेच टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, साराने सांगितले तिने तिचं करिअर नुकतंच सुरू केलं होतं. त्यामुळे तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं त्यामुळे ते वेगळे झाले. 

सुशांतचा मित्र काय म्हणाला होता?

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल हाओकिपने एका सोशल मीडिया पोस्टमधून धमाका केला होता. त्याने लिहिले होते की, सुशांत आणि सारा एकमेकांवर फार प्रेम करत होते. ईटाइम्स सोबतच्या मुलाखतीत सॅम्युअल म्हणाला होता की, सारा चांगली मैत्रीण होती. आम्ही सोबत फिरत होतो. मी तिला ब्लेम करणार नाही. कारण मला कुणीही लिखित दिलं नाही की, तिने कुणाच्या प्रेशरमध्ये ब्रेकअप केलं.

सारा आणि सुशांतच्या इक्वेशनवर सॅम्युअलने सांगितले की, मी असताना सारा आणि सुशांतचं ब्रेकअप झालं होतं. नंतर रिया सुशांतच्या आयुष्यात आली होती. पण मला नेहमीच वाटत होतं की, सारासोबत सुशांतचं अधिक चांगलं बॉंडींग होतं. जसे की, मी माझ्या पोस्टमध्ये लिहिले, दोघे एकमेकांचा सन्मान करत होते. दोघांना सोबत बघून सिनेमासारखं वाटत होतं. एनर्जी फार प्युअर होती.

हे पण वाचा :

"शूटिंगस्थळी अनेकदा सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते", श्रद्धा आणि साराचा मोठा खुलासा

श्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा!!

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड