Join us

सारा अली खानने केदारनाथला दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, "मला सतत बोलवणं यावं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:27 IST

सारा अली खान काल मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला सतत केदारनाथला जाण्याचं कारण विचारलं.

सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूडमधील स्टारकिड्सपैकी एक. सैफ अली खानची लेक साराने आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. अजूनही ती शर्यतीत टिकण्याचा प्रयत्न करत आहे. साराचे गेले काही सिनेमे फारसे चालले नाहीत. त्यामुळे ती पुढील प्रोजेक्ट्ससाठी मेहनत घेत आहे. दरम्यान सारा अनेकदा केदारनाथला दर्शनाला जाते. तिचा पहिला सिनेमाही 'केदारनाथ' च होता. केदारनाथला जाण्याची तिला नेहमीच ओढ असते याचं कारण तिने नुकतंच एका इव्हेंटमध्ये सांगितलं.

सारा अली खान काल मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला सतत केदारनाथला जाण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, "मला माहित नाही पण केदारनाथशी माझं खूप खास नातं आहे. पहिल्यांदा मी केदारनाथला गेले तेव्हा मी अभिनेत्री नव्हते. आज मी जे काही आहे ते केदारनाथमुळे आहे. त्यामुळे मी कायम कृतज्ञता व्यक्त करेन. सतत तिथून बोलवणं यावं आणि मी जात राहावं. मग परत येऊन चांगलं काम करावं आणि पुन्हा तिथे जावं. हे असंच सुरु राहू दे अशीच माझी इच्छा आहे."

सारा अली खानला केदारनाथला जाण्यावरुन अनेकदा ट्रोलही केलं गेलं आहे. मात्र तिने कधीच त्याकडे लक्ष दिलं नाही. तिची भोलेनाथवर मनापासून श्रद्धा आहे हे कायम दिसून आलं. केदारनाथच नाही तर सारा अनेकदा उज्जैन महाकालेश्वरच्या दर्शनालाही गेली आहे. शिवाय इतरही मंदिरांमध्ये जाऊन तिने भोलेनाथचं दर्शन घेतलं आहे. 

सारा आगामी 'मेट्रो इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. अनुराग बासूंच्या या सिनेमात ती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथबॉलिवूड