Join us

सारा अली खान 'या' गायिकेची आहे फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 06:30 IST

'केदारनाथ' सिनेमाच्या प्रमोशनसाठी  अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान इंडियन आयडॉलच्या मंचावर आले होते.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल १० मध्ये आठवड्याच्या शेवटी पापा स्पेशल भागामधून एक भावपूर्ण सांगीतिक सफर घडणार आहे. 'केदारनाथ' सिनेमाच्या प्रमोशनसाठी  अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान इंडियन आयडॉलच्या मंचावर आले होते. टॉप ७ स्पर्धक आपल्या धमाकेदार कामगिरीने परीक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी, पाहुण्या परीक्षक उषा ऊथुप आणि पाहुणे सुशांत आणि सारा ह्या सर्वांवर आपली छाप पडणार आहेत. सारा अली खान जेव्हा मंचावर नेहा कक्करला भेटली तेव्हा तिच्यासाठी हा एक फॅन-गर्ल असल्याचा क्षण होता आणि तिने तो अनुभव सांगितला.

सारा अली खान म्हणाली, ''नेहा कक्कर एक उत्कृष्ट गायिका आहे आणि मी तिची खूप मोठी फॅन आहे. मला तिची गाणी फार आवडतात. आज हा माझ्यासाठी फॅन मोमेन्ट आहे कारण मी इथे इंडियन आयडॉल १० च्या सेटवर येण्याआधीपासूनच नेहाला भेटण्यासाठी उत्सुक होते. मी खूप काळापासून तिची गाणी ऐकत आले आहे. तिच्या गाण्यांमुळे मला वजन कमी करायला मदत झाली आहे. तिची काही हिट गाणी मी ''रिपीट मोडवर एकर ट्रेडमिलवर धावत असे.

पापा स्पेशल भागामध्ये सारा अली खानचे बाबा म्हणजे सैफ अली खाननेही तिच्यासाठी एक भावनात्मक संदेश दिला. सैफ अली खान म्हणाला, ''असं बऱ्याच वेळा झालं आहे की सारा लहान असताना आम्ही परदेशी टॅक्सीने फिरत असू आणि टॅक्सी ड्रायव्हरने आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. कारण ती खूप गोड आणि बडबडी होती आणि प्रवास संपेपर्यंत टॅक्सी ड्रायव्हरबरोबर गप्पा मारत असे. आत्ताही ती तेवढीच गोड आणि नम्र आहे. मला तिच्याबद्दल अभिमान वाटतो, ती खूप चांगलं काम करून एक स्टार बनेल.''

टॅग्स :सारा अली खाननेहा कक्करसैफ अली खान