Join us

मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच सारा अली खान अडचणीत, या दिग्दर्शकाने खेचलं कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 15:09 IST

आता पुन्हा एकदा हा सिनेमा वादात सापडला असून अभिनेत्री सारा अली खानवर लीगल नोटीसमध्ये अडकली आहे.  

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांचा 'केदारनाथ' हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादांमध्ये अडकला आहे. या सिनेमाचं शूटिंग पुन्हा करावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा हा सिनेमा वादात सापडला असून अभिनेत्री सारा अली खानवर लीगल नोटीसमध्ये अडकली आहे.  

'केदारनाथ' हा सिनेमा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार होता. पण शूटिंग पुन्हा करावं लागल्याने सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने सारा अली खानला कोर्टात खेचलं आहे. अभिषेक कपूरनुसार, 2017 कॉन्ट्रॅक्ट साईन केल्यावर साराला या सिनेमात घेण्यात आले होते. 

या कॉन्ट्रॅक्टनुसार सारा अली खानला सिनेमाच्या शूटिंगसाठी ठरलेल्या सर्व तारखांना उपस्थित रहाणं गरजेचं आहे. सिनेमाचं शूटिंग मे आणि जून दरम्यान केलं जाणार आहे. याच दरम्यान सारा अली खानने रणवीर सिंह सोबतचा रोहित शेट्टीचा 'सिंबा' सिनेमा साईन केला. अशात तिने केदारनाथच्या डेट्स सिंबा सिनेमाच्या शूटिंगला दिल्या. 

अभिषेक कपूरने कोर्टात अपील केली आहे की, केदारनाथ रिलीज होईपर्यंत सारा अली खानला कोणताही सिनेमा साईन न करण्याचा आदेश दिला जावा. आणि कॉन्ट्रॅक्ट तोडल्याच्या कारणाने तिला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा. 

टॅग्स :बॉलिवूड