Sanya Malhotra: 'दबंग गर्ल' सान्या मल्होत्राने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. सान्याने 'दंगल' 'कटहल', 'सीक्रेट', 'पटाखा', 'बधाई हो', 'जवान' यांसारख्या चित्रपटांमधून अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारण्यासाठी सान्या लोकप्रिय आहे. सध्या ती 'मिसेस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण, तुम्हाला माहितेय सान्याबद्दल एका ज्योतिषीने (Sanya Malhotra Reveals Astrologers Prediction) भाकीत केलं होतं, जे तिने चुकीचं सिद्ध केलं. तर याबद्दल जाणून घेऊया.
सान्यानं 'न्यूज २४'शी बोलताना दिल्ली ते मुंबई आणि दंगल सिनेमाबद्दल मोकळेपणाने गोष्टी उघड केल्या. तर यासोबतच तिच्याबद्दल करण्यात आलेल्या एका भाकितांविषयीही सांगितलं. मुलाखतीत सान्याला प्रश्न विचारण्यात आला की "तुझ्याबद्दल अशी भविष्यवाणी केली गेली होती का तू कधीही अभिनेत्री होणार नाही?", यावर उत्तर देत ती म्हणाली,"हो... हे खरे आहे. पण मला विश्वास होता की मी एक दिवस अभिनेत्री होईन".
सान्या मल्होत्राने तिच्या आमिर खान स्टारर 'दंगल' या चित्रपटातून डेब्यू करत ती भविष्यवाणी खोटी ठरवली होती. 'दंगल' चित्रपटाने सान्याला एका रात्रीत स्टार बनवलं. या चित्रपटात ती बबिता कुमारीच्या भूमिकेत होती. आतापर्यंत सान्याने आमिर आणि शाहरुख खानसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. आज तिची बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते.