Join us
Daily Top 2Weekly Top 5

विना मेकअप दिसली कपूर खानदानची ही स्टार किड, ओळखा कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:28 IST

तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार हे मात्र नक्की.

आपल्या पालकांपेक्षा 'हम भी कुछ कम नहीं' असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.  बॉलीवूडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर. चुलत बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली शनाया अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. सोनम कपूरचा विवाह सोहळ्यातील शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला. इतक्या सगळ्या सेलिब्रेटींमध्ये शनाया कपूरने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चुलत बहिण सोनमप्रमाणेच फॅशनिस्टा अशी शनाया कपूरची ओळख आहे. 

आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलीवूडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.मात्र तिचा एक विना मेकअप फोटो सध्या व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या फोटोवर युजर्सन अनेक प्रतिक्रीया देत असून तिच्या सौंदर्यांच्याही प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळंतय. एकुणच काय तर शनाया कोणत्याही सिनेमात झळकली नाही तरीही तिचा सोशल मीडियावर फॅन फोलोविंग प्रचंड आहे. विविध अंदाजातील फोटो पाहून बॉलिवूडमध्ये कधी एंट्री होणार असे प्रश्न तिला विचारले जात आहे. त्यामुळे शनायाचा ग्लॅमरस अंदाज पाहून सारेच तिच्यावर फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शनाया कपूरसुद्धा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार हे मात्र नक्की. 

करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी खबर होती. अलीकडे शनाया करणच्या ऑफिसबाहेर दिसल्यानंतर शनायाचा डेब्यू पक्का मानला गेला होता.आता या डेब्यूची तयारी सुरु झाली आहे. अर्थात हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून शनायाने डेब्यू केलाय. शनायाची आई महिम कपूर हिने मुलीचा एक जुना फोटो शेअर करत, ही माहिती दिली होती. माझी लेक शनाया दोन आठवड्यांसाठी लखनौला रवाना झालीय. तिथे ती असिस्टंट डायरेक्टर  म्हणून काम करेल, असे महिमने सांगितले.

 

शनायाला अभिनेत्री बनायचे आहे. पण त्यापूर्वी अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतील सर्व बारकावे शिकण्याकडे तिचा कल आहे. याचमुळे हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याचा अनुभव तिला घ्यायचा आहे. अर्थात लखनौमध्ये शनाया कुण्या दिग्दर्शकाला असिस्ट करणार, कुठल्या चित्रपटासाठी असिस्ट करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :शनाया कपूर