Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तचा गँगस्टर अंदाज, 'साहेब बीबी और गँगस्टर-3'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:03 IST

अभिनेता संजय दत्तचा सिनेमा 'साहेब बीबी और गँगस्टर'च्या सिक्वेलच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.

मुंबई- अभिनेता संजय दत्तचा सिनेमा 'साहेब बीबी और गँगस्टर'च्या सिक्वेलच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. तारखेबरोबरच सिनेमाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. 'साहेब बीवी और गँगस्टर-3'या सिनेमाचा फर्स्ट लूक अभिनेता संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या सिनेमात संजय दत्तचा हटके लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या फर्स्ट लूकमध्ये संजय दत्तचा गँगस्टर अंदाज पाहायला मिळतो आहे. 'साहेब बीवी गँगस्टर-3' हा सिनेमा 27 जुलै 2018 रोजी सिनेमागृहात येतो आहे. डेट मार्क करून ठेवा', असं कॅप्शन संजय दत्तने फर्स्ट लूक पोस्ट करताना दिलं आहे. 

सिनेमाच्या पोस्टरमध्ये अभिनेता संजय दत्त हातात बंदूक पकडून खुर्चीवर बसलेला दिसतो आहे. या पोस्टरमधून संजय दत्तचा डॉन अंदाज पाहायला मिळतो आहे. 

 

'साहेब बीबी और गँगस्टर-3' हा सिनेमा 27 जुलैला प्रदर्शित होईल. याच दिवशी संजय दत्तचा वाढदिवसही असतो. 2011मध्ये 'साहेब बीबी और गँगस्टर' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेा जिमी शेरगील, माही गिल आणि इरफान खान प्रमुख भूमिकेत होते. तर या सिनेमाचा सिक्वेल 2013मध्ये आला होता. 'साहेब बीबी और गँगस्टर'च्या सिरीजमधील हा तिसरा सिनेमा असून या सिनेमातून दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया काहीतरी वेगळं सादर करण्याच्या तयारीत आहेत. 

टॅग्स :संजय दत्तसाहेब बिवी और गँगस्टर-3बॉलिवूड