Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला वाटलं आता मी मरणार...", संजय दत्तला आठवले जुने दिवस, 'त्या' वाईट सवयींमधून 'असा' आला बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:33 IST

"दोन वर्ष मी...",संजय दत्तचा मोठा खुलासा, वाईट सवयींपासून 'अशी' केली स्वत:ची सुटका 

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटसृष्टीत कायम दुर्दैवाच्या लाटांवर हेलकावे खात आपल्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी झालेला अभिनेता म्हणून संजय दत्तला ओळखले जाते. परंतु त्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता. सुनिल दत्त आणि नरगिस या आईवडीलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा पुढे नेत त्याने रॉकी चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊळ ठेवलं. तेव्हाच आई नरगिसचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यावेळी नैराश्याला सावरण्यासाठी ड्रगच्या व्यसनाचा आधार घेतला.संजय दत्त हा त्याच्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळे फार चर्चेत राहिला. दुर्दैव कायम संजय दत्तच्या पाचवीला पुजलेले होते. 

अलिकडेच संजय दत्तने हिंमाशू मेहता यांच्या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात  अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींविषयी मोकळेपणाने सांगितलं.या मुलाखतीमध्ये त्या वाईच सवयींबद्दल बोलताना अभिनेत्याने म्हटलं,"एकदा नेहमीप्रमाणे मी सकाळी उठलो, बाथरुममध्ये आणि स्वत:चा चेहरा आरश्यात पाहून घाबरलो. मला वाटलं आता मी मरणार... माझा चेहरा वेगळाच दिसत होता. या सगळ्यात माझे वडील पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यावेळी मला अमेरिकेतील व्यसनमुक्ती केंद्रात जावं लागलं.  तिकडे मी जवळपास दोन वर्ष राहिलो. "

तो काळ माझ्यासाठी....

"अमेरिकेत मी असताना अनेक कॉउंन्सलर मला भेटले. त्यांच्यासोबत तिकडे शांत नदी किनारी जाऊन बसायचो. या सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय केल्या. ते माझ्याशी चित्रपटांबद्दस बोलायचे. प्रत्येक बारीक-सारिक गोष्टींवर आमच्यात चर्चा व्हायची. त्यानंतर मला जाणीव झाली की, इतकी वर्ष मी फक्त बर्बाद केली. असं निसर्गाच्या सानिध्यात राहणं, मॅरेथॉनमध्ये सहभागी होणं आणि बाईक रायडिंग करणं या सगळ्यात फार मजा यायची.तो अनुभव खूपच वेगळा होता. हेच आयुष्य मला पाहिजे होतं आणि तो काळ माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला."

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर संजय दत्तला पुन्हा कधी त्या ठिकाणी जावं लागलं का?असा प्रश्न विचारला गेला.त्यावर तो म्हणाला,"मी पुन्हा तिकडे कधीच गेलो नाही त्या गोष्टीला जवळपास ४० वर्ष होतील. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं तो मी नव्हतोच. माहित नाही मी सगळं कसं केलं."

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Dutt recalls drug addiction, near-death experience, and recovery.

Web Summary : Sanjay Dutt recounted his battle with drug addiction, triggered by his mother's death. He felt near death due to his addiction. With his father's support, he sought treatment in America, which he calls a turning point, embracing nature and healthy activities, leading to recovery and a new perspective on life.
टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडसेलिब्रिटी