Join us

मोहम्मद अझरूद्दीन झाला आजोबा; सानिया मिर्झाची बहिण अनम-असदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 15:47 IST

लग्नानंतर तीन वर्षांनी असद-अनम झाले आई-बाबा

Sania Mirza: लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा (Anam Mirza) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohd Azharuddin) याचा मुलगा असद (Asad) अझरुद्दीन यांच्या घरी नव्या (Baby Girl) पाहुण्याचे आगमन झाले. २०१९ मध्ये अनम आणि असदचे लग्न शानदार पद्धतीने जंगी सोहळ्यात पार पडले होते. लग्नाच्या सुमारे ३ वर्षानंतर त्यांनी आज त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. यामुळे मोहम्मद अझरूद्दीनही आज पहिल्यांदा आजोबा झाला.

अझरुद्दीनची सून अनम मिर्झा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. अनम मिर्झाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अनमने सांगितले की, त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी अनम आणि तिचा पती असद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बाळाच्या आगमनाची घोषणा केली. तिने 'बॉस बेबी गर्ल'चा अॅनिमेटेड फोटो पोस्ट केला. त्यावर लिहिले, "ही एक छोटी बॉस लेडी आहे. बेबी अनम असद आली आहे.” यासोबतच तिने हार्ट इमोजी पोस्ट केला. त्यानंतर तिच्या जवळच्या आणि कुटुंबातील सदस्यांनी जोडप्यावर अभिनंदनाच्या संदेशांचा वर्षाव सुरू केला. पाहा तिची पोस्ट-

२०१९ मध्ये सानियाची बहीण अनम आणि अझरुद्दीनचा मुलगा असद यांचे लग्न झाले. अनम मिर्झाने २१ मार्च २०२२ रोजी तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली. जुलै महिन्यात तिच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर आले होते. अनम मिर्झा ही फॅशन डिझायनर आहे. तर असद हा क्रिकेटपटू आहे. मात्र तो बड्या स्पर्धांमध्ये अद्याप खेळलेला नाही. २१ मार्च २०२२ रोजी अनमने तिच्या इन्स्टा हँडलवर तिचा पुतण्या इझान मिर्झा मलिकचा व्हिडिओ शेअर करून तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली होती. ती पद्धतदेखील अतिशय युनिक होती.

टॅग्स :सानिया मिर्झाप्रेग्नंसीसोशल मीडिया