Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुझी मिठी, तुझं प्रेम अन् तुझं सौंदर्य...", संग्राम साळवीची खुशबू तावडेसाठीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:55 IST

संग्रामने बायको खुशबू हिच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Sangram Salvi - Khushboo Tawde : अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. लवकरच खुशबू आणि संग्राम दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आज खुशबू तावडे हिचा वाढदिवस आहे. संग्रामने बायको खुशबू हिच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत खुशबू तावडेचा वाढदिवस त्याने अधिक स्पेशल केला आहे. 

संग्राम साळवीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.खुशबूसोबतचा एक गोड फोटो त्यानं पोस्ट केला आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये संग्रामने लिहिलं की, "खुशूब तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी मिठी, तुझे kisses, तुझा पाठिंबा, तुझा सल्ला, तुझा संयम, तुझं प्रेम, तुझं सुंदर मन, तुझं ऐकणं, तुझा दयाळूपणा, सुंदर आठवणी तयार करण्याची तुझी क्षमता, तुझं सौंदर्य, तुझा काळजी घेणारा स्वभाव, तुझी निष्ठा, तुझं हसणं, तुझा आश्वासक आवाज, तुझं प्रोत्साहन देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं असणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुझे खूप खूप आभार". 

संग्रामच्या या पोस्टवर चाहत्यांनीदेखील कमेंट करत खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खुशबू आणि  संग्राम साळवी  हे दोघेहीजण एकमेकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतात. दोघांमधील खास बॉन्डिंग कायम दिसून येतं. त्यांनी २०१८ साली लग्न केलं होतं. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव असून लवकरच खुशबू तिच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहे. याच कारणासाठी तिने 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेला अलविदा केले.

टॅग्स :संग्राम साळवीसेलिब्रिटीटेलिव्हिजनमराठी अभिनेता