प्रभासच्या 'स्पिरिट' या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. हा बहुचर्चित सिनेमा रिलीज कधी होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर 'स्पिरिट' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या पोस्टर आणि ऑडियो टीझरने 'स्पिरिट' चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच 'स्पिरिट' चित्रपटाच्या रिलीज डेट बद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सुरुवातीला 'स्पिरिट' हा चित्रपट ५ मार्च २०२७ रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची घोषणा झाली आहे. 'स्पिरिट'ची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार अशी चर्चा होती. परंतु हा सिनेमा ठरलेल्या तारखेलाच म्हणजेच ५ मार्च २०२७ ला रिलीज होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा आता 'स्पिरिट' १ डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित करण्याची रणनीती आखत होते. ही तारीख त्यांच्यासाठी लकी मानली जात आहे, कारण २०२३ मध्ये याच तारखेला रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर 'अॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'स्पिरिट' चित्रपट सुरुवातीला त्यातील कलाकारांमुळे चर्चेत होता. या चित्रपटात आधी दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती, परंतु निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे आता तिच्या जागी तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. सध्या संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोरवर काम करत असून त्याचा फर्स्ट लूक पोस्टर आधीच प्रदर्शित झाला आहे.
Web Summary : Prabhas' 'Spirit' release may shift from Eid 2027 due to Salman Khan's film. December 2027 is considered as a potential new release date.
Web Summary : प्रभास की 'स्पिरिट' की रिलीज सलमान खान की फिल्म के कारण ईद 2027 से खिसक सकती है। दिसंबर 2027 को संभावित नई रिलीज तिथि माना जा रहा है।