Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लोकांना हे माहिती नाही की, क्रांती माझी....', अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:02 IST

समीर यांनी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्नगाठ बांधली आहे. अवधूतने समीर यांना क्रांतीशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला.

अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी)चे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबई क्रुज ड्रग्स केस प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यनसह काही जणांना ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान समीर वानखेडे यांनी अलिकडेच झी मराठीवर गाजत असलेल्या अवधुत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्त या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. जी सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. 

खुपते तिथे गुप्तेमध्ये अवधूत गुप्तेने वानखेडेंना प्रश्न विचारत बोलतं केलं. अवधूत गुप्तेच्या प्रश्नांना समीर वानखेडेंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अगदी रोखठोक उत्तरं दिली. या मुलाखतीत वानखेडेंनी अंडरवर्ल्ड, मुंबई ड्ग्ज केस या मुद्यांवर भाष्य केलं. समीर यांनी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्नगाठ बांधली आहे. अवधूतने समीर यांना  क्रांतीशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला.

तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं? असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला. यावर वानखेडेंनी अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, ''माझ्यावर टीका केली जाते की मी अमूक लोकांना पकडतो आणि माझी पत्नी अभिनेत्री आहे. खूप कमी लोक हे माहिती आहे की ती माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. तिला मी तेव्हापासूनच आवडतो होते. '' यावर अवधूत गुप्तेने तुम्ही तिला कॉलेजमध्ये असताना प्रपोज केलं नाही का? असं विचारलं, यावर उत्तर देताना समीर म्हणाले, ''नाही इगो इश्जू असतात ना, त्यामुळे मी तिला विचारलं नाही, पण मला ती आवडायची. मग तिनेच पुढाकार घेतला आणि मला विचारल. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं.''

समीर वानखेडे यांनी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरशी २०१७ साली लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. वानखेडे आणि क्रांती यांना दोन जुळ्या मुली आहेत. 

टॅग्स :समीर वानखेडेक्रांती रेडकर