Join us
Daily Top 2Weekly Top 5

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:08 IST

समंथाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले...

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ (Samantha Ruth Prabhu) प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील  जोसेफ प्रभू यांचं निधन झालं आहे. समंथाने स्वत:च इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही दु:खद बातमी दिली. काल एकीकडे समंथा तिच्या 'सिटाडेल हनी बनी' सीरिजच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. तर दुसरीकडे आज तिला या दु:खद प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. समंथाच्या वडिलांचं निधन नक्की कशामुळे झालं हे अजून समोर आलेलं नाही. 

समंथा रुथ प्रभूने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, 'बाय डॅड, तोपर्यंत जोवर आपली पुन्हा भेट होत नाही.' यासोबत तिने हार्टब्रेक इमोजी शेअर केला आहे. समंथाचे वडील जोसेफ हे तेलुगू अँग्लो इंडियन होते. तर तिच्या आईचं नाव निनेत्ते प्रभू आहे. समंथाचा जन्म चेन्नईत झाला. आता तिच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. याचा तिला धक्का बसला आहे. 

काही दिवसांपूर्वीच समंथा तिच्या वडिलांविषयी बोलली होती. गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, "माझं वडिलांसोबतचं नातं तसं कठीण होतं. मला माझ्या हक्कांसाठी लढावं लागायचं. माझे वडील तसेच भारतीय पालक असतात तसेच आहेत. त्यांना वाटतं ते आपली सुरक्षा करत आहेत. पण माझ्या वडिलांनी अनेकदा माझ्या कौशल्यावर अविश्वास दाखवला. तू इतकी स्मार्ट नाहीस असंही ते मला म्हणाले होते. 

समंथाच्या आयुष्यात एकामागोमाग एक वादळंच येत आहेत. २०२१ मध्ये तिचा नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाला. यानंतर तिला मायोसायटिस आजाराचं निदान झालं. यादरम्यान समंथाची तब्येती खूप खालावली होती. तिने अभिनयातूनही ब्रेक घेतला होता. नुकतंच तिने पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली. तोच आता तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. समंथाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीपरिवारमृत्यूTollywoodसोशल मीडिया