Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला आई व्हायचं आहे...", समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 09:29 IST

आई होण्यासाठी उशीर झाला आहे का यावर समांथा म्हणाली...

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या चर्चेत आहे. वरुण धवनसोबतची तिची सीरिज 'सिटाडेल हनी बनी' ओटीटीवर रिलीज झाली आहे. यामध्ये समांथाने अॅक्शन सीन्स दिले आहेत. तसंच प्रेक्षकांना वरुण समांथाची केमिस्ट्रीही पसंतीस पडली आहे. मधल्या काळात तिला मायोसायटिस आजाराचं निदान झालं. आधी घटस्फोट आणि नंतर आजार यामुळे समांथाने मोठ्या संघर्षाचा सामना केला. आता नुकतंच तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली.

समांथा रुथ प्रभू साऊथमधील आणि आता हिंदी सिनेसृष्टीतीलही लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१७ साली तिने अभिनेता नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ३ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आजही तिला याचं खूप दु:ख होतं. नुकतंच एका मुलाखतीत समांथाने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी ती खूप उत्सुक असल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणाली,"आई होण्यासाठी उशीर झाला आहे असं मला मुळीच वाटत नाही. मी आजही आई होण्याचं स्वप्न बघते. लोक अनेकदा वाढत्या वयाची चिंता करतात. पण मला वाटतं आयुष्यात असं कोणतंच वय नाही ज्यात तुम्ही आई  होऊ शकणार नाही."

समांथाला सीरिजमध्ये एक लहान मुलगी असते. समांथा म्हणाली, 'मी तिच्याशी बोलत असताना मला वाटायचं की मी माझ्याच मुलीशी संवाद साधत आहे."

सध्याच्या आयुष्यातील घडामोडींविषयी समांथा म्हणाली, "आता मी आधीपेक्षा खूप खूश आहे. मी आयुष्याच्या चांगल्या टप्प्यातून जात आहे. तसंच स्वत:ची काळजी कशी घेतली पाहिजे आणि कशावर लक्ष दिलं पाहिजे हे मला ठाऊक आहे. मी प्रत्येक दिवस छान जगत आहे."

टॅग्स :समांथा अक्कीनेनीपरिवारवेबसीरिज