Samantha Bought New House in Mumbai: तेलुगू स्टार अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सध्या तिचा आगामी सिनेमा ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) वरून चर्चेत आहे. सिनेमाच ट्रेलर आधीच रिलीज झाला असून फॅन्स सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशात आता अशी माहिती समोर येत आहे की, सामंथाने मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. याआधी नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाने मुंबईत घर खरेदी केलं होतं.
सामंथाने काही दिवसांआधी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती सनसेट व्ह्यूसोबत पोज देताना दिसली होती. हा फोटो नव्या लोकेशनवर क्लीक करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा तिचा फोटो मुंबईतील एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील नाही तर मुंबईतील एका मोठ्या इमारतीमध्ये घेण्यात आला होता. अशात असा अंदाज लावला जात आहे की, सामंथाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं.
रिपोर्ट्सनुसार, ‘यशोदा’ (Yashoda) फेम सामंथाने मुंबईत लक्झरी थ्री-बेडरूम अपार्टमेंट खरेदी केलं आहे. इथून समुद्राचा व्ह्यू शानदार दिसतो. त्यासोबतच अशीही चर्चा केली जात आहे की, या घराची किंमत 15 कोटी रूपये आहे. पण अजून याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान सामंथाच्या कामाबाबत सांगायचं तर ती तिच्या दुसऱ्या हिंदी सिनेमात बिझी आहे. यात ती वरूण धवनसोबत दिसणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, ती प्रोजेक्टमुळेच मुंबईत शिफ्ट झाली आहे. असंही सांगण्यात येत आहे की, सामंथा बॉलिवूडच्या आणखी काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
सामंथाने याआधी गेल्यावर्षी एक्स हसबंडचं हैदराबादमधील घर खरेदी केलं होतं. घटस्फोटानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. नंतर अशी बातमी समोर आली होती की, सामंथाने एक्स हसबंडचं घर खरेदी केलं आहे. जिथे ते राहत होते. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की, या घरासोबत तिच्या काही भावना जुळलेल्या होत्या. त्यामुळेच तिने हे घर खरेदी केलं. यासाठीही सामंथाने मोठी रक्कम दिली होती.