साऊथमधले दोन मोठे स्टार्स सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे सध्या काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी 'कुशी' चित्रपटाचे शूटिंग करत होते. एका सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले व प्राथमिक उपचार करण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अॅक्शनने भरलेल्या सीनच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही गंभीर दुखापत झाली, त्यामुळे काही तास शूटिंग थांबवावे लागले.
रिपोर्टनुसार विजय देवरकोंडा यांच्या टीमच्या प्रवक्त्याने पोर्टलला सांगितले की, “समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा काश्मीरमधील पहलगाम भागात एका स्टंट सीनचे शूटिंग करत होते, त्यादरम्यान त्यांना दुखापत झाली. दृश्य खूप अवघड होते. दोन्ही कलाकार लिडर नदीवरील दोरीने बांधलेल्या पुलावरून गाडी चालवायची होती, परंतु दुर्दैवाने, गाडी खोल पाण्यात पडली आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली."
ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनंतर समंथा आणि विजयनं पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. त्यानंतर श्रीनगर येथे शूटिंग करण्यात आलं. शूटिंग दरम्यान दोघांची पाठ खूप दुखत होती. त्यानंतर दोघांनी फीजियोथेरीपी घेतली.
खुशी चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी एक पोस्ट ट्विटरवर शेअर करुन या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. समंथा आणि विजय यांच्यासोबतच मुरली शर्मा, जयराम, सचिन खेड़ाकर, सरन्या प्रदीप, वेनेला किशोर हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.