Join us

का व्हायरल होतोय शाहरुखच्या डुप्लिकेटसोबतचा सलमान खानचा व्हिडीओ; पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:28 IST

कलाकारांसारखे हुबेहूब दिसणाऱ्या त्यांच्या अनेक फॅन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बॉलिवूड कलाकारांसारखे हुबेहूब दिसणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. ऐश्वर्या राय, कतरीना कैफ, सलमान खान अशा अनेक कलाकारांसारखे हुबेहूब दिसणाऱ्या त्यांच्या अनेक फॅन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानसोबत किंग खान शाहरुखचा डुप्लिकेट दिसत आहेत. 

स्वत:ला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा डुप्लिकेट म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने सलमान खानची भेट घेतली. यावेळी तो शाहरुखचे डायलॉग बोलून दाखवू लागला. पण, तो बोलायला लागताच सलमान आपले हसू आवरू शकला नाही. यानंतर शाहरुख खानचा डुप्लिकेट दोन - तिने रिटेक घेतो. दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

शाहरुख खान आणि सलमान खान दोघांसाठी वर्ष २०२३ हे लकी ठरले आहे. दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एकीकडे पठाण, जवान यांनी अनेक मोठे रेकॉर्ड तोडले, तर दुसरीकडे सलमानच्या टायगर 3 नेही मोठी कमाई केली आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडशाहरुख खान