Join us

तृषा कृष्णनच्या हातातून निसटला सलमान खानचा सिनेमा 'द बुल', या बोल्ड तेलगू अभिनेत्रीनं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:27 IST

The Bull : 'द बुल' हा करण जोहर निर्मित अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट २०२५मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.

२०२३ हे वर्ष भाईजानसाठी काही खास नव्हते. या अभिनेत्याचे किसी का भाई किसी की जान आणि टायगर ३ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, या दोघांनाही बॉक्स ऑफिसवर व्यवसाय करणे कठीण झाले होते. टायगर ३ अजूनही फ्लॉप म्हणून टॅग होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. सलमान खान (Salman Khan) आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत खूप फोकस आहे. यामध्ये द बुल(The Bull)चा समावेश आहे, ज्याची नवीन माहिती समोर आली आहे.

द बुल एक अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर चित्रपट आहे, ज्याची निर्मिती करण जोहर करत आहे. सलमान खान या चित्रपटाबाबत खूप सीरियस आहे, कारण तो २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. 'द बुल'मध्ये सलमान खानसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत आहे. आता द बुलच्या संदर्भात बातमी आली आहे की, साऊथची आणखी एका अभिनेत्रीने त्रिशा कृष्णनला रिप्लेस केले आहे. रिप्लेस करणारी अभिनेत्री हिंदी प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच खूप लोकप्रिय आहे. अभिनेत्री तिच्या बोल्ड अवतारासाठी अनेकदा चर्चेत असते.

या अभिनेत्रीची लागली वर्णीद बुलच्या स्टार कास्टमधील बदलाबाबतचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात तेलुगू अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या जागी त्रिशा कृष्णनची निवड करण्यात आली आहे, म्हणजेच द बुलमध्ये सलमान खान आणि समांथा यांची फ्रेश जोडी पाहायला मिळू शकते. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ऊं अंटावा गाण्यातून घातला धुमाकूळसमांथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील हिट अभिनेत्री आहे. द फॅमिली मॅन या वेब सीरिजनंतर ही अभिनेत्री उत्तर भारतातही लोकप्रिय झाली. अल्लू अर्जुनच्या पुष्पा - द राइज या चित्रपटातील ऊं अंटावा या आयटम साँगने सामंथाची लोकप्रियता कमालीची वाढवली. यासह ही अभिनेत्री पॅन इंडियाची स्टार बनली. तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :सलमान खानकरण जोहर