Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानसोबत 'सूर्यवंशी' सिनेमात दिसलेली शीबा आता कशी दिसते? बघा तिचा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:07 IST

Actress Shiba : १९९२ मध्ये आलेल्या 'सूर्यवंशी' सिनेमात शीबा सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. दोघांची जोडी खूप पसंत केली गेली होती.

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मोजक्या सिनेमातून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली. ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये काही सिनेमात दिसणारी शीबा (Shiba) ही सुद्धा त्या स्टार्सपैकी एक आहे. शीबाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं. काही हिट सिनेमात ती दिसली. १९९२ मध्ये आलेल्या 'सूर्यवंशी' सिनेमात शीबा सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. दोघांची जोडी खूप पसंत केली गेली होती.

त्यानंतर शीबाने आणखी काही हिंदी सिनेमात काम केलं. मग ती पंजाबी इंडस्ट्रीकडे वळली. इथेही तिने काही सिनेमे केले आणि मग नंतर ती टीव्ही शोजमध्ये दिसू लागली. ती 'करिश्मा- द मिरॅकल ऑफ डेस्टिनी' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली. 'हासिल' मालिकेतही ती दिसली. काही मालिकांमध्ये ती निगेटिव्ह भूमिकेत दिसली.

शीबा सांगते की, गेल्या काही वर्षात टेलिव्हिनमध्ये बराच बदल झाला आहे. मी अशी व्यक्ती आहे जिला दररोज नवीन काहीतरी करायला आवडतं आणि नव्या ठिकाणांवर जायला आवडतं. मला काही नवीन शो आवडतात. शीबा सांगते की, सूर्यवंशी सिनेमा तिच्या करिअरमधील सर्वात खास गोष्ट आहे. हा सिनेमा तिच्या करिअरमधील सर्वात मोठा हायलाइट्सपैकी एक आहे. सलमान एक चांगला को-स्टार होता. ज्याप्रकारे त्याने करिअर पुढे नेलं ते फार जबरदस्त आहे. त्याला बघून मी फार आनंदी आहे. या सिनेमाच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत.

शीबाने आकाशदीपसोबत लग्न केलं. ती आता सध्या तिची फॅमिली लाइफ एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावरही शीबा अॅक्टिव आहे. ती सोशल मीडियावर शीबा आकाशदीप नावाने अॅक्विट आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसलमान खान