Join us

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:04 IST

संजय दत्त खलनायक, तर सलमान खान...

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या तयारित व्यग्र आहे. लडाखमध्ये या सिनेमाचं शूट झालं. या सिनेमासाठी सलमान खूप मेहनत घेत आहे. त्याने वजन घटवलं असून आता त्याचे अॅब्सही दिसत आहेत. नुकतंच सलमानने बॉडी दाखवत फोटो शेअर केला होता. आता सलमानची आणखी एका सिनेमात एन्ट्री झाली आहे. खास मित्र रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खानही एक भूमिका साकारणार आहे.

सलमान खानचे मागील अनेक सिनेमे सलग आपटले. 'सिकंदर'कडून अपेक्षा होती पण तोही सिनेमा चालला नाही. आता सलमानला 'बॅटल ऑफ गलवान'कडून अपेक्षा आहेत. त्यातच तो आता रितेशच्या सिनेमातही दिसणार असल्याची चर्चा आहे. रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान आणि संजय दत्तही दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आधारित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान आणि संजय दत्त दोघांचं शूटिंग शेड्युलही लॉक झालं आहे. संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे त्याचं शेड्युल डिसेंबरपर्यंत पोस्टपोन करण्यात आलं आहे. सलमान खानच्या एन्ट्रीमुळे चाहते खूश झाले आहेत. 

'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खान जीवा महाले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जीवा महाले दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते. ते  शिवाजी महाराजांचे सहयोगी आणि वीरसेनानी होते.  प्रतापगडाच्या लढाईत जिवा महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. या सिनेमाविषयी आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे संजय दत्त सिनेमात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सलमान खानने याआधी रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमातही कॅमिओ केला होता. तसंच दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'वेड' या सिनेमातही तो रितेशसोबत 'वेड लावलंय' या गाण्यात दिसला होता. दोघांच्या घट्ट मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत. आपल्या मित्राच्या सिनेमात आता सलमान पुन्हा भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan joins Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji' as Jeeva Mahala.

Web Summary : Salman Khan joins friend Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji' as Jeeva Mahala. Sanjay Dutt will play Afzal Khan. The film highlights Shivaji Maharaj's valor.
टॅग्स :सलमान खानरितेश देशमुखबॉलिवूड