Join us

सलमानच्या 'सिकंदर'ला प्रेक्षकच मिळेना! अखेर थिएटर मालकांंनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:54 IST

सलमान खानच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये क्वचितच असं घडलं असेल. वाचा सविस्तर (salman khan)

सलमान खानचा (salman khan) 'सिकंदर' सिनेमा ईदच्या निमित्ताने झाला. ३० मार्चला रिलीज  झालेल्या 'सिकंदर' (sikandar movie) सिनेमाची चांगली कमाई होईल अशी अटकळ बांधली जात होती. सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. पण नंतर मात्र भाईजानच्या करिअरमध्ये कधी घडलं नाही ते 'सिकंदर'निमित्त घडतंय. अनेक थिएटर्स मालकांनी अपुऱ्या प्रेक्षकसंख्येमुळे 'सिकंदर' सिनेमाचे शो कमी केले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाला मोठा फटका बसणार आहे.

थिएटर्समधून 'सिकंदर'चे शो काढले

सलमान खानचा  'सिकंदर' रिलीज होऊन तीन दिवस झाले. पण तरीही अपेक्षेपेक्षा कमी गर्दी 'सिकंदर' पाहण्यासाठी होत आहे. त्यामुळे तीन दिवसात  'सिकंदर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही कमी आहे. मिडिया रिपोर्टनुसार सूरत, इंदौरसारख्या शहरांमध्ये  'सिकंदर'चे शो कमी करुन त्याजागी इतर सिनेमांचे शो लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ऑडियन्स नसल्यामुळे शो कॅन्सल करावे लागत आहेत. भोपाल, अहमदाबाद सारख्या ठिकाणी  'सिकंदर'चे काही शो रद्द करुन त्याजागी गुजराती सिनेमांचे शो लावण्यात आले आहेत.

 'सिकंदर' पाहण्यापेक्षा लोक स्थानिक भाषेतील सिनेमे पाहण्यास जास्त प्राधान्य देत असल्याने थिएटर्स मालकांनी तसा निर्णय घेतला आहे. मुंबईत मात्र चित्र उलटं आहे. जी ७ मल्टिप्लेक्स,  गैटी गॅलेक्सी सारख्या प्राइम लोकेशनवरील थिएटर्समध्ये  'सिकंदर'चे शो वाढवण्यात आले आहेत. एकूणच मुंबई सोडून इतर ठिकाणी मात्र शो कमी झाल्याने  'सिकंदर'च्या कलेक्शनवर मोठा परिणाम होणार, हे दिसतंय. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या  'सिकंदर' सिनेमात भाईजानसोबत रश्मिका मंदान, प्रतीक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी हे कलाकार विशेष भूमिकांमध्ये दिसत आहेत.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाशरमन जोशीबॉलिवूड