Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला करायचं आहे आमिरच्या एक्स पत्नीबरोबर काम, 'लापता लेडीज' पाहून म्हणाला, "किरण राव तुला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:54 IST

'लापता लेडीज' पाहून भारावला सलमान खान, किरण रावचं कौतुक करत म्हणाला...

आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं दिग्दर्शन असलेला 'लापता लेडीज' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. लग्न झालेला नवरदेव दुसऱ्यात महिलेला पत्नी म्हणून घरी घेऊन येतो. आणि त्यानंतर स्वत:च्या पत्नीचा शोध घेतो, अशी मजेशीर कथा असलेला लापता लेडीज प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. किरण रावने दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' पाहून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही भारावून गेला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने किरण रावबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

सलमान खानने वडील सलीम खान यांच्याबरोबर किरण रावचा 'लापता लेडीज' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर सलमानने Xवरुन ट्वीट करत किरण रावचं कौतुक केलं आहे. "किरण रावचा लापचा लेडीज पाहिला. वाह वाह किरण. मी आणि माझ्या वडिलांनी हा सिनेमा खूप एन्जॉय केला. तुला दिग्दर्शनातील पदार्पणासाठी शुभेच्छा...माझ्याबरोबर कधी काम करशील?", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

किरण रावचं दिग्दर्शन असलेला 'लापता लेडीज' सिनेमा १ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात प्रतिभा रांता, नितांशी गोएल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. आमिर खानने या सिनेमाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. 

टॅग्स :सलमान खानकिरण रावसिनेमा