सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमा सुपरहिट होईल अशी अपेक्षा होती परंतु चित्र उलटं झालं. 'सिकंदर' (Sikandar Movie) सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट झाली. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी होताना दिसला. अशातच सलमान खानचं एक वक्तव्य चर्चेत आहे. सलमान खानने 'सिकंदर'निमित्त इतर ठिकाणी ज्या मुलाखती दिल्या त्यामध्ये मलाही सपोर्टची गरज आहे, असं सलमान म्हणताना दिसला. जाणून घ्या.
मलाही सपोर्टची गरज आहे सलमान खान
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत, 'हिंदी इंडस्ट्रीतील मित्र माझ्या सिनेमाचं कौतुक इतकं करत नाहीत', अशी खंत सलमानने व्यक्त केली होती. सलमान प्रत्येक वेळी त्याचे मित्र आणि इतर कलाकारांच्या सिनेमाला सपोर्ट करतो. परंतु मला आणि माझ्या सिनेमालाही सपोर्टची गरज आहे, असं अभिनेत्याने मान्य केलं. "अनेकांना वाटतं मी आत्मनिर्भर आहे. मला इतरांच्या सपोर्टची गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण असं काही नाहीये. मलाही इतरांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे". त्यामुळे सलमानने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'सिकंदर'ची संथ सुरुवात
ईदचा प्रभाव संपताच सलमानचा 'सिकंदर' डळमळीत होऊ लागला आहे. आतापर्यंत म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून गेल्या ४ दिवसांमध्ये 'सिकंदर'ने ८४.२५ कोटींचा गल्ला जमावल्याची माहिती आहे. सिनेमाला अद्याप आपलं मूळ बजेट अर्धही वसूल करता आलेलं नाही. 'सिकंदर'चं मूळ बजेट २०० कोटी आहे. सिनेमासाठी सलमानने घेतलेलं मानधन सर्वांत जास्त आहे. परंतु 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी होण्याच्या मार्गावर आहे.